मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढतो. सदाहरित, मध्यम आकाराचा काटेरी वृक्ष. खोडाची साल भेगाळलेली. पाने एकांतरीत, साधी, चामट, आखुड देठाची, देठ टोकाकडे निमुळती मध्यभागी पसरट असतात. पानं ५ ते १० ला़ब व ३ ते ५ सेंटीमीटर असतात. पानाचा वरचा भाग गडद हिरवा व गुळगुळीत , खालचा भाग फिकट हिरवा असतो. काटे काष्ठमय एक ते दिड इंच लांब अणकुचीदार असतात. काटे जास्तकरून पानांच्या बगलेत असतात. काटे फार थोडे फांद्यांवर एकटे दिसुन येतात.मंद सुवास असलेली फुल हिवाळ्यात येतात. फुल लहान, पांढरी, पानांच्या बगलेत येतात. फुल पंचभागी असल्यामुळे निदले, पाकळ्या आणि पुंकेसर प्रत्येकी पाच असतात. फळधारणा उन्हाळ्यात होते. फळे गुळसर किंवा लंबगोल दोन तीन सेंटीमीटर आकाराची असतात. त्यामध्ये एकच कठीण चकचकीत बी असते. पिवळी होऊन फळे परिपक्व होतात. पक्षी फळ खातात.