कमी,मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात, पाण्याचा निचरा होणाऱ्या, मुरमाड जमिनीत वाढणारा चिकवर्गीय, पानगळी, छोटा वृक्ष. जमीनीच्या परीस्थिती नुसार त्याची वाढ होते. खोड राखाडी तपकिरी रंगाची असते. सालीच्या पातळ खपल्या निघालेल्या असतात. पान साधी, संमुख, लाहान देठ असलेली, लवयुक्त, पसरट व टोकाकडे काहीशे लांबट टोक निघालेली असतात. काही पानाच्या कडा हलक्या झालर युक्त असतात. पानगळ हिवाळ्याच्या शेवटी होते. उन्हाळ्यात नवीन पालवी बरोबरच वृक्ष फुलु लागतो. फुल साधारण एक इंच लांब, पाच पांढरट पिवळसर पाकळ्या असलेली, केसरी रंगाच्या मुकुटात, पुंकेसराचा मोदक झालेला असतो. पावसाळ्याच्या शेवटी फळ येतात. फळ म्हणजे फुटभर लांब असलेल्या शेंगा. गर्द हिरव्या आवरणावर बारीक फिकट गुलाबी टिपके असतात. शेंगामध्ये केसाळ युक्त बारीक अनेक बिया असतता. उन्हाळ्याच्या सुरुवातीपर्यंत फळ परिपक्व होतात. औषधी गुणधर्म असलेला उपयुक्त वृक्ष.