घोळ

trema orientale

मध्यम, अधिक पावसाच्या प्रदेशात वाढणारा वृक्ष. डोंगर उताराला,मुरमाड, दगड गोट्यांच्या जमिनीत वाढलेला दिसतो. जोमाने वाढणारा वृक्ष. साधारण तिस फूट उंच वाढतो. खोड सरळ पिवळसर राखाडी रंगाचे असते. खोडाच्या भोवती आडव्या पसरलेल्या फांद्या असतात. पर्णसंभार हा वृक्षाच्या टोकाकडे निमुळता होत गेलेला असतो. मुख्य फांद्यांना बऱ्याच उप फांद्या दोन्ही बाजूंनी असतात. उप फांद्यांवर एक आड एक अशा रचनेचे पानं असतात. पान लहान देठ असलेली असतात. पानांची रचना थोडी वेगळी, पान लांबट बदामाच्या आकाराची.काही पानं देठातून एका बाजूला थोडी वक्राकार व एका बाजूला अधिक वक्रकार झालेली व टोकाकडे निमुळती टोकदार असतात. पानांच्या कडा दातेरी असतात. पान वरून हिरवी व खालच्या बाजूने पांढरट हिरवी, खालच्या बाजूने पानांच्या शिरा उठावदार व लालसर रंगाच्या असतात. पानं वरुन थोडी खरखरीत व खालच्या बाजूस काहीशी लव युक्त असतात .फुलांचा बहर खरातर एप्रिल ते जून, पण वर्षभर अधून मधून सुरू असतो. सूक्ष्म हिरवट पिवळसर फुलं दाटीने पानांच्या बगलेत येतात. फळ हिवाळ्यात येतात. फुलांच्या हंगामानुसार फळ येतात. फळ छोटी, हिरवी, गोल गुळगुळीत असतात. पिकल्यावर काळी पडतात. पक्षी फळ खातात औषधी गुणधर्म असलेला वृक्ष आहे. घोळ वृक्षापासून कोळसा चांगला तयार होतो त्यामुळे त्याला चारकोल ट्री म्हटलं जातं.

identity footer