मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात, मुरमाड पाण्याच्या निचरा होणाऱ्या जमिनीत वाढणारा नाजूक वेल. पाने साधी सन्मुख गर्द हिरवीगार, देठ असलेली, देठाकडे हृदयाकृत्ती ,पुढे पसरट व लांबट टोक निघालेली असतात. पांढरेशुभ्र फुलं, ऑगस्ट पासून यायला सुरुवात होते. हिवाळ्याच्या शेवटपर्यंत फुलं येत राहतात. फुलं पानाच्या कक्षात एकेकटी येतात. फुलं साधारण दिड इंच व्यासाची, पाच पाकळ्या, लांब नलीका युक्त असतात. फुल गळून गेलेल्या ठिकाणी, बोंड प्रकारची. बुडाशी एक सेंटीमीटर गोल बोंड व त्याला लांबट टोकदार सुळका निघलेली, असतात. फळ वाळल्यावर उकलतात. प्रत्येक फळात चार छोट्या बिया असतात. औषधी गुणधर्म असलेला, पाच सहा फुट आधार वृक्षावर उंच वाढणारा वेल.