पंचवीस ते तिस फूट वाढणारा लहान सदाहरित वृक्ष. मध्यम,अधिक पावसाच्या प्रदेशात, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत, वाढतो. आखूड खोडाचा, लोंबत्या फांद्या असलेला वृक्ष. साल करड्या रंगाची बऱ्यापैकी गुळगुळीत असते. पाने समोरासमोर, साधी, वरुन गुळगुळीत, जाडसर असतात. पाने दोन्ही बाजूला निमुळती, एक सेंटीमीटर देठ असलेली व टोकाला टोकदार व कडा दातेरी असतात. जानेवारी ते एप्रिल दरम्यान छोटी ,पांढऱ्या रंगाच्या फुलांचे बहुशाखीय तूरे पानांच्या बगलेत येतात. फुलांना मंद सुगंध असतो. फळधारणा मे जून मध्ये होते. फळे दीड दोन सेंटीमीटर, लांबट अंडाकृती आकाराची असतात. फळ पिकल्यावर गडद जांभळी किंवा काळी होतात. कमी गराची लांबट टोकदार एक बी असलेले फळ असतात. पक्ष्यांना फळ आवडतात. औषधी गुणधर्म असलेला वृक्ष.