धावडा

terminalia anogeissiana

मध्यम व अधिक पावसाच्या प्रदेशात उष्ण आणि कोरडा हवामानात वाढणारा पानगळीचा वृक्ष. उंच सरळ वाढणारा वेळ असलेला वृक्ष. मुरमाड खडकाळ पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढतो. उपलब्ध परिस्थितीनुसार त्याची वाढ कमी अधिक प्रमाणात असते. खोड बऱ्यापैकी सरळ,पांढरट गुळगुळीत सालीचे असते. पळून पडलेल्या साडीच्या ठिकाणी पांढरट खोलगट सट्टे दिसतात. आतून साल लालसर असते. निरीक्षणानुसार काही ठिकाणी वळल्यानंतर तांबूस रंगाच्या सालीच्या पातळ पापुद्रामुळे खोड व फांद्या पांढरट व तांबूस दिसतात. पान तिन ते चार इंच लंबगोलाकार गुलाबी हिरव्या रंगाच्या देठाची असतात. हिवाळ्यात पान तांबूस रंगाची होऊन, फेब्रुवारीत पानगळ होते. जमिनीच्या स्तरानुसार नवीन पालवी येण्याचा काळ हा कमी जास्त प्रमाणात असतो. सूक्ष्म सुंदर रचनेच्या फुलांचे गोंडे पावसाळ्यात येतात. गोंडे छान दिसतात. टोकदार पंख असलेले पापुद्र्यासारखी लालसर रंगाची फळ, बुडाशी संख्येने एकमेकात खोचल्यासारखे मिळुन काटेरी एक सेंटीमीटरचा गोंडा तयार होतो. छोटी फळ हिवाळ्यात येतात. हिवाळ्याचे शेवटी ती गळून पडतात. ह्या वृक्षा पासून खाण्याचा डिंक मिळतो. आयुर्वेदामध्ये त्याचा उपयोग केला जातो. औषधी गुणधर्म असलेला हा पर्यावरण पूरक वृक्ष. खूप कमी ठिकाणी वृक्षारोपण करताना त्याची लागवड केली जाते. रोपवाटिकांमध्ये रोपे उपलब्ध असल्याने वृक्षारोपणात दुर्लक्षित राहून गेला आहे. वन आणि सामाजिक वनीकरण विभागाने अशा परंपरा जैवविविधता राखणाऱ्या औषधांची रोपे तयार करण्यावर भर देणे गरजेचे आहे.

identity footer