सहा ते आठ फुट वाढणारा छोटेखानी वृक्ष किंवा झुडुप. मध्यम, अधिक पावसाच्या प्रदेशात उष्ण, कोरड्या हवामानात, मुरमाड, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढतो. शाखा उपशाखा फुटुन, भरगच्च पर्णसंभार असलेले झुडूप. साल गडद तपकिरी रंगाची. पाने संयुक्त प्रकारची. पर्णिकांच्या ७ ते १२ जोड्या असतात. पर्णिका वरुन गडद हिरव्या रंगाच्या. पिवळी, मोठी, दिड एक इंच व्यासाची, फुलं पानांच्या बगलेत येतात. फुलं वर्षभर कमी जास्त प्रमाणात येत असतात. फळ म्हणजे चपट्या शेंगा साधारण सात आठ इंच लांब, तपकिरी रंगाच्या बिया असतात. औषधी गुणधर्म असलेले, शोभिवंत झुडूप.