कमी, मध्यम, अधिक पावसाच्या प्रदेशात, मुरमाड, कुठल्याही प्रकारच्या, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत, उष्ण, कोरड्या, हवामानात वाढतो. दाट पर्णसंभार असलेला सदाहरित वृक्ष. खोड सरळ उंच वाढते. साल काहीशी गुळगुळीत, करड्या रंगाची असते. पाने संयुक्त, पर्णिकांच्या दोन ते तिन जोड्या असतात. पर्णिका पाच ते आठ इंच लांब टोकाच्या पर्णिका इतर पर्णिकांपेक्षा लांब असते. पर्णिका वरुन गर्द हिरव्या, गुळगुळीत खालच्या बाजूने विरळ लव असते. छोटी पांढरी फुले फांद्यांच्या टोकाला येतात. फुल हिवाळ्यात येतात. सुक्ष्म फुलांचा शाखायुक्त मोहर , डहाळ्याच्या टोकाला येतो. फुलांवर लव असते. उन्हाळ्याच्या सुरुवातीला फळ येतात. फळ साधारण दिड ते दोन इंच गोल, फळांवर दाट लव असते नंतर गुळगुळीत होते. पक्व झाल्यावर सुरकुत्या पडल्या असतात. फळांच्या तिन स्पष्ट खाचा असतात. प्रत्येक खाचेत एक बी असते. पुर्वी फळांचा वापर साबण म्हणून करत. दागिन्याना चमक येण्यासाठी ह्या वापर करतात. बहुगुणी असा हा वृक्ष.