कमी, मध्यम, अधिक पावसाच्या प्रदेशात, वाढणारा वृक्ष. मुरमाड, खडकाळ पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत, कोरड्या, उष्ण हवामानात वाढतो. जमीन व हवामानानुसार कमी ,अधिक उंचीचा वाढलेला असतो. दाट पर्णसंभार असलेला सदाहरित वृक्ष. खोडाची साल काळपट करड्या रंगाची आणि उभ्या खाचा पडलेल्या असतात. पान लंब गोलाकृती टोकाला थोडी काच पडलेली असते. पान जाडसर, चकचकीत, गुळगुळीत गर्द हिरव्या रंगाची असतात. खालची बाजू फिकट हिरव्या रंगाची असतात. साधारण दोन ते चार इंच लांब व दीड ते अडीच इंच रुंद असतात फांद्यांना छोट्या फांद्या असतात. त्या उप फांद्यांच्या शेंड्याला पान असतात. पानं गळून पडलेल्या उप फांद्या जाड काटे असल्यासारखे वाटतात. फार कमी पानं मुख्य फांद्यांना असतात. हिवाळ्यात पानांच्या बगलेत मंद सुवासिक पिवळसर पांढरी फुले येतात. फुलांची रचना बघत राहावी, अशी वैशिष्ट्यपूर्ण आकाराची असते. फळधारणा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होते. कॅप्सूल सारखी दिसणारे दीड ते एक सेंटीमीटर चे गुळगुळीत हिरवे फळ येतात. फळ उन्हाळ्यात परिपक्व होतात. फळ पिकल्यावर पिवळ्या रंगाची लाल ठिपके असलेली असतात. फळ म्हणजे रानमेवा. पक्षांना फळ आवडतात. खिरणीच्या रोपांवर चिकुची कलम तयार करतात.औषधी गुणधर्म असलेला हा पर्यावरणपुरक वृक्ष.