माधवीलता

hiptage benghalensis

मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात, मुरमाड, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत, उष्ण, कोरड्या हवामानात वाढणारा, बहुवर्षायू, आधार वृक्षावर उंच वाढुन, पसरणार सदाहरित महावेल. आधार शोधण्यासाठी लवयुक्त कवळ्या तपकिरी रंगाच्या फांद्या पाच सहा फूट अधांतरी तरंगत असतात. बुंधा जाड साधारण सहा ते दहा इंच व्यासाच्या असतो. पाने चार ते आठ इंच लांब, साधी, संमुख, मोठी, जाडसर, दोन्ही बाजूला निमुळती, मध्यभागी पसरट, टोकदार असतात. फेब्रुवारी सुरवातीला फुलायला लागते. फुलोरे पानांच्या बगलेत येतात. सुगंधी फुल फुलोऱ्यात खालून वरती फुलत जातात. फुलं खूपच सुंदर आकर्षक, पांढरी पिवळ्या रंगाची असतात. उन्हाळ्यात फळ तपकिरी रंगाची होऊन पक्व होतात. फळ, दोन लहान व एक मोठा असे तिन पंख असलेले, पंखांच्या मध्यभागी बि असते.‌ औषधी गुणधर्म असलेला महावेल.

identity footer