हळदु

haldina cordifolia

मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात, मुरमाड, दगडगोटे असलेल्या, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढतो. साठ सत्तर फुट उंच वाढतो. उंच वाढणाऱ्या ह्या वृक्षाचे जमीनीलगत खोड मोठे असते व शेंड्याच्या दिशेने निमुळते होत जाते. खोडाची साल जाडसर, तपकिरी करड्या रंगाची व भेगाळलेली असते. अंतरसाल पिवळी असते. फांद्या जमीनीला व शेंड्याकडे जास्त असतात. कवळ्या फांद्या व पानांना लव असते. पान मोठी, हृदयाकृती असतात. नवीन पालवी पानकळीतुन निघते. समुख गोलसर एक ते दोन सेंटीमीटर गोल उपपर्ण असतात. उपपर्ण नंतर गळून पडतात. पानगळी नंतर लवकरच नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते. पानगळ उन्हाळ्यात होते. फुल संख्येने सूक्ष्म पिवळ्या रंगाची असतात. ती गोल गोटीदार फुलोऱ्यात येतात. सुंदर अशी एक इंच गोल पिवळ्या हिरवट रंगाचे फुलोरे, जसे एखाद्या पिवळ्या रंगाच्या छोट्या चेंडूला हिरवा माथा असलेल्या पांढऱ्या टाचण्या टोचल्या सारख्या वाटतात. फुलण्याचा हंगाम पावसाळ्यात असतो. फळ हिवाळ्यात येण्यास सुरुवात होते. सुक्ष्म फळांचे एक सेंटीमीटर खडबडीत गोलसर झुपके असतात. उन्हाळ्यात फळ गळून पडतात. बहुउपयोगी, औषधी गुणधर्म असलेला वृक्ष.

identity footer