कमी, मध्यम पावसाच्या प्रदेशात वाढणारा, मुरमाड, दगडगोट्याच्या, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत, उष्ण, कोरड्या, दमट हवामानात वाढणारा पानगळीचा वृक्ष. खोड सरळ, साल राखाडी रंगाची. साल खवले पडुन गळत असते. पान बुडाशी हृदयाकृती, मध्यापर्यंत पसरट होत जात नंतर एकदम निमुळते होतात. पानांच्या कडा बारीक दातेरी असतात. पानांना खालच्या बाजूला लव असते. पान वरुन गर्द हिरव्या रंगाची असतात व खालच्या भाग फिकट हिरवा असतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला पानगळ होते व एप्रिल मे मध्ये नवीन पालवी बरोबर फुल येण्यास सुरुवात होते. फुल पिवळ्या रंगाची, पाच लांबट केसाळ संदले मागच्या बाजूला वळलेली व पाच छोट्या पाकळ्या व असंख्य पुंकेसर असलेली असतात. फुल कालंंतराने गडद लाल रंगाची होतात व गळून पडतात. फळ वाटण्या येवढे दोन ते तिन फळ एकमेकांना चिकटलेली असतात. सुरुवातीला फिक्कट हिरवी असलेली फळ परिपक्व झाल्यावर गडद जांभळ्या रंगाची किंवा काळपट रंगाची होतात. ह्याची फळ हे एक चांगला रानमेवा आहे.