उक्षी

getonia floribunda

मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात, मुरमाड, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत, उष्ण, कोरड्या, दमट हवामानात वाढणारा बहुवर्षायू महावेल. खोड कठीण, तपकिरी रंगाचे, बारीक भेगाळलेले असते. कोवळ्या फांद्यांवर तांबूस लव असते. पाने देठ असलेली, साधी, संमुख, दोन्ही बाजूला निमुळती, टोकाकडे टोक निघालेले व लवयुक्त असतात.‌ पानांच्या शिरा वरतुन स्पष्ट व खालच्या बाजूने उठावदार असतात. पानं वरतून हिरवी व खालच्या बाजूने फिकट हिरवी असतात. फेब्रुवारीत फांद्यांच्या टोकांना मोठे बहुशाखीय, केसाळ फुलोरे येतात. फुल म्हणजे पाकळ्या रहीत, पाच केसाळ, हिरवट संदले असतात. त्यात असमान आकाराचे पुंकेसर असतात. उन्हाळ्यात फळ येतात. फळ साधारण एक सेंटीमीटर लांबट आकाराचे त्याच्या भोवती वाळलेल्या केसाळ निदलांचा वेढा असतो. औषधी गुणधर्म असलेला महावेल.

identity footer