अटरुण / तांबट

flacourtia indica

मुरमाड, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत, कोरड्या हवामनात, साधारण वीस ते पंचवीस फूट वाढणारे मोठे झुडुप किंवा लहान उंचीचा काटेरी वृक्ष. साल तपकिरी ते गडद राखाडी रंगाची, खोडावर छोट्या पट्या सोलल्या सारख्या निघालेल्या असतात. एक ते दिड इंच लांबीचे सरळ काटे असतात. काटे विरळ असतात. पानं, दिड ते दो इंच लांबीचे, एक आड एक, डहाळ्यांना असतात. पानांच्या आकारात बदल दिसून येतो, अंडाकृती ते गोल, बोथट व बुडाला पसरट किंवा देठाच्या येथे खाच पडलेली‌ असतात. पानं जाडसर व कडा दातेरी असतात. नवीन पालवी लालसर रंगाची असते कालांतराने हिरवी होत जातात, त्यावेळी लाल दातेरी कडा उठून दिसतात. पानगळ डिसेंबर जानेवारीत होते. नवीन पालवी मार्चमध्ये येण्यास सुरुवात होते. फुल पानगळ झाल्यावर, नवीन पालवी येण्याअगोदर, संख्येने झाडावर दिसून लागतात. फुल छोटी,पाच बाह्यदल असलेली, पाकळ्यारहीत,अनेक पुंकेसर व पिवळ्या रंगाचे परागकोष असलेली, फुल असतात. फळ अर्धा ते एक सेंटीमीटर गोल आकाराची फळे उन्हाळ्याच्या शेवटी परिपक्व होतात. फळ खाण्यायोग्य व फळ चवीला गोड असतात. फळ पक्ष्यांन साठी मेवाच असतो. औषधी गुणधर्म असलेला हा वृक्ष आहे.

identity footer