आंबुळगी

elaeagnus conferta

जास्त पावसाच्या प्रदेशात, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढणारा बहुवर्षायू, सदाहरीत महावेल. बुंधा चार ते सहा इंच जाड असतो. खोड आणि फांद्यावर जाडसर अणकुचीदार एक दिड इंच काटे असतात.‌पान एकांतरीत, साधी, वरुन हिरवी गुळगुळीत व खालच्या बाजूने चंदेरी चमकदार असतात. त्यामुळे अंबुळगी वेल लगेचच लक्षात येतो. हिवाळ्यात फुलांचे छोटे गुच्छ पानांच्या बगलेत दिसु लागतात. गुच्छां मध्ये कुठे संख्येने छोटे फुल असतात तर कुठे तिन चार च असतात. फुलांवर पण चमकदार चंदेरी लव असते. उन्हाळ्याच्या सुरुवातीला फळधारणा होते. फळ दोन ते तिन सेंटीमीटर लांब व एक सेंटीमीटर रुंद असतात. फळ लालसर, चंदेरी असतात. फळावर सात ते आठ उभ्या उंचवटा व रेषा असतात. फळ म्हणजे रानमेवा, चविला आंबटगोडसर असतात. फळात एकच बी असते. औषधी गुणधर्म असलेला, पर्यावरण पुरक शोभिवंत वेल.

identity footer