पिवळा करमळ / छोटा करमळ

dillenia pentagyna

मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात वाढणारा, मध्य उंचीचा दाट पर्णसंभार असलेला, पानगळ होणारा वृक्ष. उपलब्ध वातावरण व परिस्थिती नुसार वाढ कमी जास्त होते. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढतो. खोड फिकट करड्या तपकिरी रंगाचे असते. कवळी पानं लालसर रंगाची, लव युक्त असतात. पुर्ण वाढ झाल्यावर चकचकीत हिरवी होतात. पाने एकांतरीत, एक ते तिन फूट लांब, अर्धा ते एक फूट रुंद. पान फांद्याच्या टोकाला झुबक्यांनी येतात. पानांच्या कडा करवतीप्रमाणे दातेरी असतात. मध्य शिरेच्या दोन्ही बाजूच्या असंख्य उपशिरा एकमेकांना समांतर असून त्या उठावदार असतात. पान देठाकडे निमुळती टोकाकडे टोक निघालेली असतात. पानांची रचना खूपच सुंदर असते. पानगळ मार्च एप्रिल दरम्यान होते. पानगळ झाल्यावर निष्पर्ण झाडावर पिवळ्या रंगाच्या फुलांचा बहर दिसू लागतो. फुल साधारण एक ते दोन इंचाची, पाच पाकळ्या असलेली सुंदर रचनेची. फुलांना मंद सुगंध असतो. फुल फांद्यांवर येतात. फळ मे जून मध्ये येण्यास सुरुवात होते. लांब देठ असलेली फळ, डांगराच्या आकाराची, दीड दोन सेंटीमीटर व्यासाची, पिकल्यावर पिवळी किंवा बदामी रंगाची होतात. चवीला अंबट गोड लागतात. फळ पक्षांना आवडतात. दुर्मिळ होत चाललेला हा महत्त्वपूर्ण, पर्यावरणी परिसंस्था राखणारा, औषधी गुणधर्म असलेले वृक्ष.

identity footer