कमी मध्यम जास्त पावसाच्या प्रदेशात वाढणारा हा वृक्ष असून, मुरमाड, खडकाळ, हलक्या प्रतीच्या जमिनीत, कोरड्या, उष्ण हवामानात वाढतो. खोड सरळ उंच वाढते. राखाडी तपकीरी रंगाची साल असते. पातळ सालीचे लांबट तुकडे गळून पडतात. पर्णसंभार धाट असतो. पाना संयुक्त पद्धतीचे पाच किंवा सात पर्णिका असतात. चार किंवा सहा लहान देठाच्या पर्णिका एका आड एक येतात व एक लांब देठाची पर्णिका टोकाला असते. पर्णिका गोलसर, कडा झालरी युक्त असतात. पर्णिकांना टोकाला बारी खाच असते. पानगळ उपलब्ध जमीन व वातावरणानुसार होते. काही ठिकाणी उन्हाळ्याच्या सुरुवातीला पानगळ होते. काही ठिकाणी सदाहरित राहतो. नवीन पालवी उन्हाळ्याच्या शेवटी येण्यास सुरुवात होते. छोटी पांढरी फुल एप्रिल ते जूनच्या दरम्यान येतात. त्यानंतर फळ म्हणजे चपट्या शेंगा येण्यास सुरुवात होते. डिसेंबर जानेवारीत शेंगा परिपक्व होतात. परिपक्व शेंगा तपकिरी रंगाच्या साधारण दोन ते तीन इंच लांब व इंचभर रुंद असतात. शेंगांमध्ये दोन ते चार बिया असतात बियांच्या खुणा बाहेरून स्पष्टपणे दिसतात. शिसम चे लाकूड खूप मौल्यवान आहे. कोरीव कामासाठी या लाकडाचा उपयोग होतो. आयुर्वेदिक गुणधर्म असलेला हा वृक्ष आहे.बऱ्याच नर्सरींमध्ये शिसव हा वृक्ष शिसम म्हणून दिला जातो. पानांवरून दोघांचा फरक लगेच लक्षात येतो. शिसव च्या पर्णिकेला टोक असतात.