पिळुक

combretum latifolium

कमी, मध्यम पावसाच्या प्रदेशात, उष्ण, कोरड्या हवामानात, मुरमाड, दगडगोठ्याच्या जमिनीत, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढतो. पिळुक बहुवर्षायू असलेला पानगळ होणारा महावेल आहे. बुंधा चांगला सहा ते आठ इंच जाडीचा, कठिण व पिळदार असतो. फांद्या खूप पिळ देऊन आधार वृक्षावर चढलेल्या असतात. बुंध्याची साल तपकिरी किंवा काळपट तपकिरी रंगाची, बारीक भेगाळलेली असते. पाने साधी, संमुख, गोलसर व थोडीशी टोकदार असतात. पान दोन ते पाच इंच लांब दोन ते तीन रुंद असतात. इंच फेब्रुवारी मार्च दरम्यान पानगळ होते. पानगळ होतांना पाने लालसर रंगाची होतात. फेब्रुवारी मार्च महिन्यात पानगळी दरम्यान सुगंध फुलांनी पिळून मोहरतो. छोट्या पिवळसर पांढऱ्या फुलांचे तुरे संख्येने वेलीवर दिसतात. उन्हाळ्यात तिन चार सेंटीमीटर लांबट व दोन ते चार सेंटीमीटर रुंद आकाराची, चार पातळ उभट पंख असलेली चमकदार फळ येतात. फळ आकाराने साधारण अर्जुन वृक्षाच्या फळांन सारखी पण त्यापेक्षा लहान असतात. पर्यावरणीय परिसंस्था अबाधित राहण्यासाठी उपयुक्त.

identity footer