कमी, मध्यम पावसाच्या प्रदेशात, उष्ण, कोरड्या हवामानात वाढणारा मध्यम उंचीचा वृक्ष. मुरमाड, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढतो. खोड सरळ उंच वाढते. साल फिकट तपकिरी रंगाची असते. खोडाची साल मऊ व खोलगट चिरा असतात. साधारण बुच पांगराच्या झाडासारखी असते. खोडावरच्या सालीच्या नैसर्गिक रचनेमुळे वनव्याचा सालीवर जास्त परिणाम होत नाही. पाने ,संयुक्त पद्धतीची सहा ते आठ इंच लांब. पानांवर पर्णिकांच्या विस ते चाळीस जोड्या असतात. पर्णिका फिकट पांढरट हिरव्या रंगाच्या व खालच्या बाजूला टिपके असतात. पर्णिका दोन ते तीन सेंटीमीटर लांब एक सेंटीमीटर रुंद असतात. त्यांना लहान देठ असते. पर्णिका एका आड एक असतात. पर्णिका देठा कडुन एका बाजूला सरळ व एका बाजूला वक्रकार आकाराच्या असतात. गर्द पिवळी पान होऊन,हिवाळ्याच्या शेवटी पानगळ होते. नवीन पालवी उन्हाळ्यात येते. पानगळी नंतर बोडक्या झालेल्या झाडावर, पांढऱ्या रंगाची लहान फुल संमुहाने डहाळ्यांच्या शेंड्याला येतात. फुलांची रचना सुंदर असते. फळ बोंड प्रकारची असतात. एक इंच लांब व देठाकडे अर्धा इंच रुंद टोका कडे निमुळती झालेली असतात. फळ एप्रिल दरम्यान येतात. परिपक्व झाल्यावर गर्द तपकिरी रंगाची होऊन तीन ते चार भागात उकलतात. फळांमध्ये पंखयुक्त बिया असतात. पंखाचे एक टोक रुंद असते. उन्हाळ्याच्या शेवटी, जून मध्ये फळ परिपक्व होतात. भिराचे लाकूड मौल्यवान आहे. औषधी गुणधर्म असलेला वृक्ष.