मालकांगणी / ज्योतिष्मती

celastrus paniculatus

कमी, मध्यम, अधिक पावसाच्या ठिकाणी,मुरमाड, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढणारा, पानगळ होणारा वेल. मालकांगणी हा झुडपा सारखा पसरलेला व काही फांद्या आधार वृक्षावर चढलेल्या दिसून येतात. मालकांगणी जास्त उंची गाठत नाही. ह्या वेलाच्या कोवळ्या फांद्या तपकिरी रंगाच्या व त्यावर पांढरट टिपके असतात. पाने एकांतरीत, साधी, मध्यम आकाराची, कडा काहीश्या दातेरी असतात. छोट्या हिरवट, पिवळसर, पांढरट फुलांचे तुरे हिवाळ्यात फाद्यांच्या शेंड्याला येतात. फळधारणा उन्हाळ्यात होते. फळ हिरवी चकाकणारी गोल अर्धा सेंटीमीटर व्यासाची, पिकल्यावर लालसर होतात. फळात एक ते सहा बिया असतात. आयुर्वेदामध्ये अत्यंत म्हतवाचा, औषधी गुणधर्म असलेला हा वेल.

identity footer