गेळा

catunaregam spinosa

मध्यम, अधिक पावसाच्या प्रदेशात, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढतो. गेळा छोटासा काटेरी वृक्ष, काही ठिकाणी झुडपासारखा वाढलेला दिसून येतो. पानगळ होणारा वृक्ष किंवा झुडूप. खोड सरळ, राखाडी रंगाचे किंवा गर्द तपकिरी रंगाचे व बऱ्याच फांद्या वेड्या वाकड्या वाढलेल्या असतात. त्यामुळे गेळादाट पर्णसंभार असलेला दिसुन येतो. फांद्यांना अणकुचीदार काटे पानांच्या जवळ असतात. पाने, लाहान जाडसर लहान देठ असलेली, देठाकडे निमुळती व पुढे पसरट गोलसर असतात. पान गर्द हिरवी चकाकणारी, पानावर शिरा कोरल्या सारख्या खोलगट असतात. आखुड डहाळ्यांच्या टोकापाशी पानांनी गर्दी केलेली दिसुन येते. हिवाळ्याच्या शेवटी पानगळ होते व उन्हाळ्याच्या शेवटी नवीन पालवी फुटते. उन्हाळ्याच्या शेवटी वृक्ष फुलु लागतो. जुलै पर्यंत फुलं येत राहतात. फुल पांढरीशुभ्र पाच पसरट पाकळ्या असलेली व सुवासिक असतात. गळून पडण्यापुर्वी फुलं पिवळी होतात. फळधारणा पावसाळ्यात होते. फळाची पुर्ण वाढ हिवाळ्यात होते व हिवाळ्याच्या शेवटी पिवळे होऊन परिपक्व होतात. जाड देठ असलेली फळे गोलसर, आवरण जाड व चिवट असतात. फळा मध्ये चिकट गर असतो व एक प्रकारचा दर्प असतो. फळाला मदनफळ म्हटले जाते. त्यामध्ये बऱ्याच छोट्या, चपट्या, तपकिरी बिया असतात. बहुगुणी, औषधी गुणधर्म असलेला हा छोटेखानी वृक्ष.

identity footer