कांचन / कोरल

bauhinia variegata

कमी, मध्यम, अधिक पावसाच्या प्रदेशात, मुरमाड, खडकाळ, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत, उष्ण, कोरड्या, दमट हवामानात वाढणारा पानगळ होणारा मध्यम आकारा वृक्ष. काही भागात सदाहरीत राहतो. खोड सरळ , साल गडद तपकिरी रंगाची, बऱ्यापैकी खडबडीत असते. पाने, साधी एकांतरीत, गर्द हिरवी, खालच्या बाजूने फिकट हिरवी असतात. पान मधोमध दोन भागात विभागलेले असतात. पान लांबीपेक्षा रुंद जास्त असतात. देठा कडे व टोकाकडे कमी जास्त प्रमाणात खोलगट खाच पडलेली असते. देठ एक ते तीन इंच लांब. फुल साधारण जानेवारी ते एप्रिल दरम्यान येतात. फुलं दोन ते अडीच इंच, पाच पाकळ्या असलेली, मधली वरची पाकळी मोठी व गर्द जांभळा किंवा गरद गुलाबी रंग देठा पासुन पाकळीच्या मध्ये पसरलेला व कडा फिकट रंग असलेला असते. फुलं जांभळी किंवा फिकट गुलाबी रंगाची, जमीन व वातावरणाच्या परिस्थितीनुसार रंग गर्द किंवा फिकट असतो. पाच वक्रकार पुंकेसर असतात. पुंकेसराच्या टोकाला जाडसर परागकोष असतो. फळ धारणा मार्च एप्रिल दरम्यान होते. फळ म्हणजे चपट्या सहा ते दहा इंच लांब शेंगा असतात. पक्व झाल्यावर कडक व काळपट तपकिरी रंगाच्या होतात. शेंगा पावसाळ्याच्या सुरवातीला उकलुन त्यातून बिया खाली पडतात. उकलुन वाळलेल्या शेंगा वक्रकार पिळ पडलेला असतो.‌ बिया चपट्या, गडद तपकिरी रंगाच्या असतात. बहुगुणी असा हा शोभिवंत वृक्ष.

identity footer