मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात पाण्याचा निचरा होणाऱ्या, मुरमाड जमिनीत वाढणारे मोठे झुडूप. उपलब्ध परीस्थिती नुसार पानगळ होते. खोडाला जमिनी पासून काही अंतरावर फांद्या फुटलेल्या असतात. बारीक भरपूर फांद्यामुळे दाट पर्णसंभार असतो. पाने आकाराने कांचन वृक्षा सारखीच. पानं साधी एकांतरित, पानाचे दोन भाग पडलेले असतात. दोन्ही भाग गोलसर असतात. पान वरच्या बाजूस हिरवी व खालच्या बाजूला फिकट हिरवी व लवयुक्त असतात. फुलं, तळाशी लवयुक्त संदले असलेले, पिवळ्या रंगाच्या पाच पाकळ्या असलेली मधल्या पाकळीवर गर्द किरमिजी रंगाचा उभट टिपका असतो. त्यामुळे फुलाच सौंदर्य खुलून दिसते. फुलण्याचा हंगाम पावसाळ्यात असतो. फुलं गळून गेलेल्या ठिकाणी चपट्या, चार ते पाच इंच लांब, साधारण दोन सेंटीमीटर रुंद, टोकदार शेंगा लोबतांना दिसतात. शेंगा परिपक्व झाल्यानंतर उकळतात त्यातून अंडाकृती चपट्या बिया बाहेर पडतात. औषधी गुणधर्म असलेल,शोभिवंत झुडूप.