भुजडा / जोंधरा

antidesma ghaesembilla

मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात वाढणारा, मुरमाड, दगडगोटे असलेल्या, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत,उष्ण, कोरड्या हवामानात वाढणारा वृक्ष. भुजडा छोटा, दहा ते वीस फुट वाढणारा, दाट पर्णसंभार असलेला, पानगळ होणारा वृक्ष. खोड लहान ते आठ इंच व्यासाचे असते. साल फिकट तपकिरी रंगाची व पातळ असते. नवीन पालवी व फांद्यांना लव असते. पाने साधी, एकांतरीत, जाडसर , दोन ते चार इंच लांब, व दिड ते अडीच इंच रुंद असतात. पाने देठा कडे पसरट टोकाला गोलसर किंवा काही पानांना बारीक टोक असते.‌पान वरुन गर्द हिरवी, चकचकीत, व पानावर शिरांच्या रेषा स्पष्ट दिसतात. पान खालुन फिकट हिरव्या रंगाची व उठावदार शीरा असतात. हिवाळ्याच्या शेवटी पानगळ होते, नवीन पालवी उन्हाळ्याच्या शेवटी येते. जुन मध्ये नवीन पालवी नंतर वृक्ष मोहोरू लागतो. हिरवट पिवळसर सुक्ष्म फुलांचे तुरे येतात. फळे पावसाळ्यात येतात. वाटाण्या एवढी, गोल फळ असतात. पावसाळ्याच्या शेवटी फळ काळपट जांभळी होऊन पक्व होतात. फळ म्हणजे रान मेवा. चवीला आंबटगोड असतात. फळ पिकल्यावर पक्षांची झुंबड उडते. वृक्षारोपण करतांना दुर्लक्षित राहिलेला महत्त्वाचा वृक्ष.

identity footer