अंकोल

alangium salviifolium

कमी, मध्यम पावसाच्या प्रदेशात, मुरमाड, दगडगोट्यांच्या, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत, उष्ण, कोरड्या हवामानात वाढणारा वृक्ष. उपलब्ध परिस्थितीनुसार पानगळ होते. विस ते तिस फूट उंच वाढतो. दाट पर्णसंभार असतो.‌ खोड लहान, साल फिकट तपकिरी रंगाची, बारीक भेगाळलेली. पानं गर्द हिरवी, एकांतरीत, साधी दोन्ही बाजूला निमुळती व बारीक टोक निघालेले असतात. तिन ते पाच इंच लांब व एक ते अडीच इंच रुंद व आखूड देठाची असतात. मार्चमध्ये सुगंधी फुल येतात. पानगळ होऊन बोडक्या झालेल्या वृक्षावर फुलांचा बहर म्हणजे एक सुंदर नजारा असतो. फुलं साधारण एक इंच व्यासाची, पाच ते दहा लवयुक्त पाकळ्या असलेली. पाकळ्या उलट्या वळलेल्या असतात. पांढरेशुभ्र पुंकेसर, संख्येने असतात. एक सुंदरसा लांबट पुष्पाग्र अनेक पुंकेसरांन मधुन डोकावत असतो. एप्रिल मे मध्ये फळधारणा होऊन जून जुलै मध्ये फळ पिकतात. फळ गोल, दोन सेंटीमीटर व्यासाची. फळात चिकट गोडसर पांढरा गर आणि एकच बी असते. फळ पिकल्यावर लाल किंवा जांभळट लाल रंगाची होतात.‌ फळ म्हणजे रानमेवा. पक्ष्यांना फळ आवडतात. औषधी गुणधर्म असलेला हा वृक्ष.

identity footer