हिवर

acacia leucophloea

कमी मध्यम पावसाच्या प्रदेशात वाढणारा, पानगळ होणारा वृक्ष. उष्ण कोरड्या हवामानात मुरमाड, दगड धोंडे असलेल्या, हलक्या प्रतीच्या व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमीन वाढणारा छोटे खाणी काटेरी वृक्ष. वाढ जमीनुसार कमी जास्त वाढ होते. खोड काहिशे सरळ खडबडीत, पिवळसर, पांढरट रंगाची ठिकठिकाणी काळपट डाग पडलेले असतात. खोडावर काही ठिकाणी बेंड आलेली असतात. खोडाला फांद्या साधारण पाच फुटावरून फुटलेल्या फांद्या, वेड्यावाकड्या पसरलेल्या फांद्यांना, बऱ्याच उप फांद्या दाटीने फुटलेल्या व त्यावर पानांची गर्दी असते. पर्ण संभाराचा विस्तार उपलब्ध जमिनीनुसार असतो. दाटीनी वाढलेला छोट्या फांद्यांमुळे पर्ण संभार हा भरगच्च असतो. काटे लांबट व टोकदार, जोडीने असतात. पान बाभळीच्या पानासारखीच पण उपपर्णिका छोट्या व काहीशा दाटीने असतात. फुल गोल गोंड्या सारखी, पांढऱ्या पुमकेसरावर बारीक पिवळा माथा असतो , त्यामुळे लांबून बघितल्यास पिवळसर पांढरट रंगाची दिसतात. फुल उप फांद्याच्या टोकाकडे संख्येने आलेली असतात. फुलं कोमजल्यावर पिवळी होतात. फुल पावसाळ्याच्या शेवटी येतात. शेंगा चार ते पाच इंच लांबट वक्र आकार, चार ते पाच एम एम जाड फुगीर असतात. शेंगांवर फिकट तपकिरी रंगाची लव असते. शेंगा बी असलेल्या ठिकाणी थोड्या फुगीर असतात. शेंगा हिवाळ्यात येतात व उन्हाळ्यात परिपक्व होतात. उपयुक्त हा औषधी गुणधर्म असलेला वृक्ष आहे.

identity footer